खर सांगा बाहेर फिरायला आवडत.. पण स्किन टॅन् चि भीती वाटते?? असे किती दिवस घरी बसणार? चला तर मग बाहेर फिरण्याची मनसोक्त मजा घ्या.. स्किन टॅन् चि काळजी सोडा अणि त्यासाठी आपल्याला काही गोष्टी अगदी लक्ष्यात ठेवून करायला पाहिजेत ज्यामुळे आपली स्किन टॅन् होण्यापासून बचाव होईल..
स्किन टॅन् टाळण्यासाठी 8 महत्त्वाचे उपाय..
1. सनस्क्रीन वापरा –
नेहमीच बाहेर पडताना चांगल्या प्रतीचे सनस्क्रीन लोशन लावूनच घराबाहेर पडा. सनस्क्रीनची निवड करताना आपला स्किन टाइप लक्ष्यात घेऊन त्याप्रमाणे निवडा.. 40+ SPF असलेले सनस्क्रीन साधारण पणे योग्य असतात. सूर्यापासून निघणाऱ्या UV किरणांपासून आपल्या त्वचेचे ते रक्षण करते. त्यामुळे त्वचा काळवंडत नाही.
2. स्वतः ला कव्हर करा –
उन्हात जातांना नेहमी स्वतः ला कव्हर करा. संपुर्ण चेहरा, मान झाकली जाईल असे ओढणी किंवा स्टोल च्या सहाय्याने चेहरा कव्हर करा. म्हणजे सूर्याच्या घातक किरणांपासून संरक्षण होईल. तसेच चेहर्या ईतकीच हात आणि पायांची देखील काळजी घेतली पाहिजे. यासाठी बाहेर जाताना फूल स्लिव टॉप किंवा फूल ओव्हरकोट वापरावीत. तसेच आजकाल फुल हातमोजे देखील बाजारात सहज उपलब्ध आहेत त्यांचा वापर करावा. उन्हात पाय देखील टॅन् होतात, तेंव्हा तुम्ही मोजे वापरून पायाचे टॅन् होणे टाळू शकता.
3. सावलीतून चाला –
उन्हाळ्यात रस्त्यावरून चालताना जमेल तेव्हढे सावलीतून चाला. रस्त्याच्या कडेला झाडे किंवा इमारतिची सावली पडलेली असते. त्या सावलीतून चालणे फायदेशीर ठरेल.
4. हायड्रेटेड राहा –
आपली त्वचा हायड्रेटेड ठेवणे खूप महत्त्वाचे असते आणि त्यासाठी दिवसातून 12 ते 15 ग्लास पाणी प्यावे. यामुळे डिहायड्रेशन होण्यापासून बचाव होतो आणि स्किन टॅन् पासून देखील बचाव होतो..
5. सनग्लासेस वापरा –
UV protected सनग्लासेस वापरल्याने तीव्र सुर्यकिरनांपासून डोळ्याचे तसेच डोळ्याखालील त्वचेचे रक्षण होते. कारण डोळ्याखालील त्वचा ही चेहर्याच्या ईतर भागांपेक्षा नाजूक आणि सेनसिटीव असते. त्यामुळे उन्हात बाहेर पडताना UV protected सनग्लासेस वापरावेत..
6. परफ्यूम वापरणे टाळा –
परफ्यूम हा आपल्या जीवन शैलीतील एक महत्त्वाचा घटक झाला आहे. अगदी रोजच् आपण त्याचा वापर करतो. पण परफ्यूम वापरल्याने आपली त्वचा जास्त सेनसिटीव होते व लवकर स्किन टॅन् व्हायला सुरुवात होते. त्यामुळे उन्हात जाताना परफ्यूम वापरणे टाळा..
7. सकस आहार –
निरोगी आणि स्वच्छ स्किन साठी चांगला सकस आहार घेणे खुप महत्त्वाचे आहे. आहारात फळ आणि हिरव्या पालेभाज्या चा समावेश करावा.
8. चेहरा धुणे –
दिवसातून कमीत कमी दोन वेळा थंड पाण्याने चेहरा धुणे गरजेचे आहे. यामुळे तुमची त्वचा स्वच्छ आणि तजेलदार राहील..
Leave a comment